२४ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

0
6

गोंदिया,दि.२१ : बाजार किंवा व्यवसाय या संकल्पनेत ग्राहक हा महत्वाचा घटक समजला जातो. त्या अनुषंगाने २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २४ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी करतील. यावेळी जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते उपस्थित राहतील. शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे तहसिलदार संजय पवार व जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी कळविले आहे.