.त्या डॉक्टरांना निलंबीत करा  शिवसेनेची मागणी

0
15
गोंदिया,दि.१ -येथील बाई गंगाबाई रुग्णालयातील काही डॉक्टरांनी गर्भवती महिलेची कसलीच तपासणी नकरता मुतखडा आजार झाल्याचे सांगुन केटीएस  रुग्णालयात पाठविले. त्यातच रुग्णालयात पोहचताच तिला प्रसूती झाली. तर डॉक्टरांच्या गलथानपणामुळे त्या महिला व बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान त्या बेजबाबदार डॉक्टरांना निलंबीत करा अशी मागणी येथील शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
२७ जानेवारी रोजी तालुक्यातील मुरदाडा येथील प्रभाबाई उपवंशी पोटात इजा होत असल्यामुळे गोंदियाच्या गंगाबाई शासकिय रुग्णालयात उपचाराकरिता गेली ती गर्भवती होती. ड्युटीवर असलेल्या गंगाबाई स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता मुतखड्याचा आजार असल्याचे सांगून तीला के.टी.एस. रुग्णालयात पाठविले असता के.टी.एस. रुग्णालयात गेल्यावर लगेच त्या स्त्री ने बाळाला जन्म दिले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या स्त्री चे जीव सुद्धा जाऊ शकत होते. दरम्यान ही बाब शिवसेनेच्या पदाधिकाèयांच्या लक्षात येताच त्यांनी तेथील डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. तर अशाप्रकारचे निष्काळजीपणा करणारे डॉक्टारांच्या विरोधात गोंदिया शहर शिवसेना, युवा नेता व भारतीय विद्यार्थी सेनेन  पाऊल उचलून शिवसेनेचे शहर प्रमुख दीप बोबडे, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी समीर आरेकर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक प्रशांत कोरे यांच्या नेतृत्वात जिल्हा शल्य चिकित्सक रवि धकाते यांना निवेदन सादर करून संबंधित डॉक्टराला निलंबीत करण्याची मागणी केली.
 के.टी.एस.रुग्णालय  व गंगाबाई स्त्री रुग्णालयाची अव्यवस्था संबंधी चर्चा करून निष्काळजीपणा बाळगणारे डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित डॉक्टरांवर त्वरीत कारवाई करण्याचे शिवसेनेच्या पदाधिकाèयांना आश्वासन दिले आहे. याप्रसंगी भा.वि.सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत ठवकर , शिवसेना शहर उपप्रमुख चुन्नी चौरावार, विनोद तामसेटवार, युवा सेनाचे उपजिल्हा युवा अधिकारी हिमांशु कुथे, पुरुषोत्तम ठाकरे, प्रशांत कोरे, कमलेश बनकर, रोहित भारद्वाज, अतूल दादोरिया, योगेश बेलगे, प्रशांत ठाकुर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.