शहर ठाण्याच्या हद्दीत रामनगर पोलिसांची कारवाई

0
10

गोंदिया,दि. १६: -रविवावरचा दिवस सायकांळची वेळ दोन युवक बालाघाट मार्गावरील दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी जातात.दारू प्यालानतंर मात्र पैसे न देता दुकानदारांशी हुज्जत घालून तिथून पळ काढतात.त्याची माहिती सदर व्यक्ती पोलिसांना देतो.तोपर्यंत हे युवक रामनगर पोलीस ठाण्याची हद्द सोडून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेले असतात.माहितीच्या आधारावर रामनगरचे दोन पोलीस अधिकारी तपासाला निघतात.तपास करीत सरळ ते नेहरू चौकात असलेल्या चौपाटीवरच पोचतात.त्यांना तिथे आधीच माहीत असलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून त्या युवकांचा शोध घेण्यास सुरवात करतात.ते करीत असतानाच सदर युवक परिसरातच कुठल्या तरी पोहावाल्याच्या दुकानाच्या मागे दारू पित्त बसल्याचा सुगावा या अधिकाèयांना लागतो.तेवढ्यातच त्या दोनपैकी एक युवक उड्डाणपुलाखाली असलेल्या एका पानठेल्याजवळ आपल्या दुचाकीजवळ जाऊन गाडी सुरू करण्याचा प्रयत्नात असतो तेवढ्यातच कुठलाही आभास न होऊ देता हे पोलीस अधिकारी त्या युवकांना आपल्या ताब्यात घेतात आणि शहर पोलीस मात्र भटकलीही नाही या चर्चा चौपाटीसह उड्डाणपुलाखालील दुकानाजवळ एैकावयास मिळाल्या.
हा सर्व प्रकार रविवारच्या रात्रीला ८ ते ८.३० च्या सुमारासचा असल्याचे त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या अनेकांनी सांगितले.विशेष म्हणजे यावेळी त्यास्थळावर बजरंगदलाचे विदर्भ प्रातांध्यक्ष देवेश मिश्रा,गुड्डा ठाकूर यांच्यासह काही पत्रकार मंडळीही हजर होती.त्यानंतर रामनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार त्याठिकाणी पोचले आणि त्या दोन्ही युवकाकडे असलेले साहित्य हस्तगत करून त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
या सर्व प्रकरणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रताप दराडे व सत्यजीत ताईतवाले यांनी ज्यापध्दतीने त्या युवकांना पकडले त्यांच्या कार्यप्रणालीची स्तुती झालीच पाहिजे.परंतु या प्रकरणात कुठेच सहा.पोलीस उपनिरीक्षक भीमqसह चंदेल यांचा हातभार नसतानाही त्यांना मात्र आपली स्तुती करवून घेण्याचीही शौक झाल्याचे काही वृत्तावरून बघावयास मिळाले.असो परंतु ज्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपींना पकडण्यात आले त्यावेळी शहर पोलिसांची यंत्रणा काय करीत होती की रामनगर पोलिसांना ही कारवाई करावी लागली या चर्चांणा आता उधाण आले आहे