शैक्षणिक सत्र २०१६-१७ ई-स्कॉल पोर्टल सुरु राहणार

0
10

गोंदिया,दि.३ : जिल्ह्यातील पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती निर्धारित वेळेत मिळावी याकरीता ई-स्कॉल पोर्टल हे खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहे. तरी सर्व महाविद्यालयांनी आपल्याकडील विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबीत राहणार नाही व खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयाने अंमलबजावणी करावी. मॅट्रीकपूर्व सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे- १५ जून ते ३० नोव्हेंबर, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाने नूतनीकरण करुन ऑनलाईन सादर करणे- १ जून ते ३० नोव्हेंबर, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरीता नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेणे- १ जुलै ते ३० नोव्हेंबर, नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे ऑनलाईन आणि पडताळणी करीता प्रस्ताव सादर करणे- १५ जुलै ते १५ डिसेंबर, ज्या महाविद्यालयांना नवीन मान्यता मिळालेली आहे किंवा सिस्टीमवर असलेल्या महाविद्यालयास नवीन अभ्यासक्रमास मान्यता मिळालेली आहे अशा प्रकरणी ई-स्कॉल सिस्टीमवर सन २०१६-१७ करीता मॅपिंग करणे- १ मे ते १५ डिसेंबर २०१६. या वेळापत्रकानुसार सर्व महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे नियोजन करावे. कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घ्यावी. असे समाज कल्याचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी दिली.