सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात चुकांचे धडे

0
15

पुणे: महाराष्ट्र राज्य पुस्तक मंडळाने पुन्हा एकदा घोळ घातला आहे. बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात यंदा अशा काही चुका केल्या आहेत की ते ऐकून तुम्हाला चक्करच येईल.

 इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारत नाही, तर चीनचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. महामंडळाच्या चुकांचा पाढा इथेच संपत नाही, तर यापुढे जाऊन पाकव्याप्त काश्मिरला स्वतंत्र प्रदेश दाखवण्यात आला आहे.याचसोबत मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या कान्हेरी गुहा या पुस्तकातील नकाशात चक्क पाण्याच्या खाली दाखवण्यात आल्या आहेत.या सगळ्या चुकांचा कळस म्हणजे भारताची राजधानी दिल्ली ज्या यमुना नदीच्या काठावर वसली आहे, तिच्या विरुद्ध तीरावर दाखवण्यात आली आहे.त्यामुळे इतक्या तज्ज्ञ मंडळींच्या नजरेखालून तयार करण्यात आलेल्या पुस्तकात जर इतक्या गंभीर चुका राहणार असतील, तर विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन काय शिकायचं हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.