विमुक्त भटक्यांसाठी आता ‘पालावरची शाळा‘

0
13

गोंदिया,दि.१६(berartimes.com)-:भटके विमुक्त व मांग गारोडी समाजातील नागरिक व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा उदात्त उद्देश ठेवत ‘अखिल भारतीय विमुक्त भटके विकास परिषद‘ गोंदिया जिल्हा तर्फे ‘पालावरची शाळा‘ या शैक्षणिक सेवाचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.५ मार्च रोजी स्थानिक कुडवा भागात मांग गारोडी समाजावस्तीत या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन दिनेशभाई पटेल यांच्या हस्ते झाले. अन्य मान्यवरांमध्ये इंदुलता हरिणखडे,उमेश मेंढे, प्रभाकर ढोमणे, ओमप्रकाश मेठी, अनील असाटी, कुणाल बिसेन, संजय कुलकर्णी तसेच मांग गारोडी वस्तीतील सर्व पुरुष महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सेवा प्रकल्पअंतर्गत मांग गारोडी समाजवस्तीत दररोज दोन तास अभ्यासिका चालणार असून स्थानीक सुशिक्षीत युवक वस्तीतील शालेय मुलेच मानधनावर अभ्यास शिकविणार आहेत. संचालन मांग गारोडी वस्तीतील सुशील कांबळे व आभार बाळू बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू कांबळे, प्रभू शेंडे, सुरेश शेंडे, सुनील वाघमारे आदींनी प्रयत्न केले.