विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहाव्या नंबरवर

0
18

नवी दिल्ली-केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज देशातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांचं रँकिंग जाहीर केलं. विद्यापीठांच्या यादीत बंगळुरुच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सने अव्वल क्रमांक मिळाला, तर विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेच्या एकत्रित यादीतही याच संस्थेने पहिला नंबर मिळवला. तर आयआयटी मुंबई तिसऱ्या नंबरवर राहिली.विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहाव्या नंबरवर आहे. तर देशभरातील एकूण शिक्षण संस्थांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 18 वा नंबर आहे.

शिक्षणसंस्था रँकिंग :
आयआयएस, बंगळुरू
आयआयटी चेन्नई
आयआयटी मुंबई
आयआयटी खरगपूर
आयआयटी दिल्ली
जेएनयू विद्यापीठ
आयआयटी कानपूर
गुवाहटी आयआयटी
आयआयटी रुरकी
बनारस हिंदू विद्यापीठ
विद्यापीठ रँकिंग
1 इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू
2 जेएनयू
3 बनारस हिंदू विद्यापीठ
4 जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स सायंटिफिक रिसर्च
5. जादावपूर विद्यापीठ, कोलकाता
6 अण्णा विद्यापीठ, चेन्नई
7 हैदराबाद विद्यापीठ
8 दिल्ली विद्यापीठ
9 अमृत विश्व विद्यापीठ, कोईम्बतूर
10 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

इंजिनिअरींग रँकिंग
आयआयटी मद्रास
आयआयटी मुंबई
आयआयटी खरगपूर
दिल्ली आयआयटी
कानपूर आयआयटी
रूरकी
आयआयटी गुवाहाटी
अण्णा विद्यापीठ चेन्नई
जाधोपूर कोलकाता
आयआयटी हैदराबाद
मॅनेजमेंट रँकिंग

१ आयआयएम, अहमदाबाद

२ आयआयएम बंगळुरु

३ आयआयएम कोलकाता

४ आयआयएम लखनौ

५ आयआयएम कोझिकोड

६ आयआयटी दिल्ली

७ आयआयटी खरगपूर

८ आयआयटी रूरकी

९ झेवियर लेबर रिलेशन इन्स्टीट्यूट जमशेदपूर

१० आयआयएम इंदौर

नॅक आणि एमडीएकडून मूल्यांकन केलं जात होतं. परंतु मोदी सरकारने संस्थांची रॅंकिंग करण्याचा निर्णय घेतला. गुणवत्ता असलेल्या संस्था लोकांना कळाव्या, हा यामागचा उद्देश आहे. चांगल्या गुणवत्तेच्या संस्थांना जास्त मदत केली जाईल.यावेळेस पेटंट किती दाखल केले, प्लेसमेंट किती दिली, शिक्षकांची गुणवत्ता काय, हे पाहिले, असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.