माना समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत झळकावे -अरविंद सादेकर

0
12

चिमूर,दि.05- समाजातील विद्यार्थी प्राविण्य घेऊन मोठ्या पदावर जातात. समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे येणाऱ्या प्राविण्य प्राप्त सामान्य गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करावे.  जेणे करून निवासस्थाने व मोफत शिकवणी वर्ग उभारता येईल. यामुळे गरीब हुशार विद्यार्थ्यांना त्याच लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांनी सुद्धा सातत्याने प्रविण्य वर्चस्व यादीत झळकत राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे  आवाहन माना जमात समनव्य समितीचे कार्याध्यक्ष अरविंद सांदेकर यांनी केले
आदिम माना जमात मुंबई शाखा चिमूरच्या वतीने गुणवत्ता विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात  अरविंद सादे कर हे बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माना आदिम जमात मंडळ मुंबई चे अध्यक्ष वासुदेव धारने, विजय घरत ,परशुराम ननावरे, पत्रू ननावरे  ढोने, डा चौधरी,माया ननावरे, उपसभा पती शांताराम सेलवतकर,प्रकाश  वाकडे, घोडमारे,गरमडे, आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पं. स. उपसभापती शांताराम सेलवतकर यांचा सत्कार करण्यात आला.
अरविंद सादेकर पुढे म्हणाले की, माना समाजातील ९५ टक्के हुशार विद्यार्थी हे गरीब शेतकरी व मजूर असल्याने ते पुढील शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी स्वतःच्या निधीतून नागपूर किंवा जांभुळ घाट येथील महाविद्यालयात मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगत जात वैधता प्रमाण पत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य श्रीरामे यांनी केले. संचलन बबन गायकवाड यांनी केले  यावेळी विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते