कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी केले अडपल्ली येथे सकस चारा निर्मितीबाबत मार्गदर्शन

0
10

गडचिरोली,दि.19: येथील कृषी महाविद्यालय व कृषि विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने तालुक्यातील  अडपल्ली येथील  शेतकऱ्यांना सकस चारा निर्मिती बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनी शिवानी पांडूरंग कावळे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सकसचारा बनवितांना चाऱ्यावर युरीयाची प्रक्रीया सावलीमध्ये करावी.  100 किलो निकृष्ट चाऱ्याकरीता चाळीस लिटर पाण्यात 4 किलो युरिया, 10 किलो गुळ, 2 किलो मीठ यांचे एकत्र द्रावण तयार  तयार करुन मिसळावे व हवाबंद असे ठेवावे. 21 दिवसाने ते उघडून जनावरांना खायला घालावे.  तीन ते चार महिन्यापेक्षा लहान असलेल्या जनावरांच्या पिलांना चारा देऊ देऊ नये.  चारा रुचकर लागत असल्याने जनावरे तो आवडीने खातात.  व पचन्यास हलका जातो.  त्यामुळे  शेतकऱ्यांनी शेतातील निकृष्ठ चारा सकस करावा असे आवाहन सुध्दा यावेळी करण्यात आले.याप्रसंगी महिला शेतकरी  वंदना दिनकर मंगर, तसेच शेतकरी व विद्यार्थिनी काजल अगडे, मानसी कुमरे, मोनी शेरकी, प्रणाली जांभुळे , पुजा बलकी उपस्थित होत्या.