विद्यापीठाकडून अखेर बाह्य परीक्षकाची नियुक्ती

0
9

वरोरा : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाने बाह्य परीक्षकाची नियुक्ती करूनही ेबाह्य परीक्षक आलेच नाही. त्यामुळे चक्क सहा दिवस बाह्य परीक्षकाविना परीक्षा सुरू होती.याबाबत वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. बुधवारीच बाह्य परीक्षकांची तातडीने नियुक्ती करण्यात आली. या केंद्रावर आता बाह्य परीक्षा रुजू झाले आहेत.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयाच्या केंद्रावर १३ एप्रिलपासून परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाची नियुक्ती व त्यासोबत बाहेरील महाविद्यालयातील प्राध्यापकाची बाह्य परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येते.

गोंडवाना विद्यापीठाने बाह्य परीक्षक म्हणून नेमणूक केलेली व्यक्ती परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून गैरहज होती. ही बाब नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती व परीक्षा प्रमुखांनी विद्यापीठास तातडीने कळविली देखील. तरीही कसलीही दखल झाली नाही. अशा अवस्थत मागील सहा दिवसापासून लोकमान्य महाविद्यालयाच्या केंद्रावर बाह्य परीक्षकाविना परीक्षा सुरू होती.