१७ कर्मचा-यांची उचलबांगडी

0
7

नागपूर : कारागृहातील कुख्यात व खतरनाक गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या संशयावरून नागपूर मध्यवर्ती कारागृहातील १७ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना विदर्भातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये पाठविण्यात आले आहे.

गेल्या ३१ मार्चच्या पहाटे नागपूर कारागृह फोडून पाच खतरनाक कैदी पळून जाण्यात यशस्वी ठरले. ‘जेल ब्रेक’ या नावाने ही घटना संपूर्ण राज्यात गाजत आहे. या घटनेनंतर नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाची कसून चौकशी केली जात आहे. कर्मचाऱ्यांशी संबंध असल्यामुळेच ते पाच कैदी कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचेही आता जवळपास निश्चित झाले आहे. या दिशेनेसुद्धा तपास केला जात आहे. दरम्यान, अशा कुख्यात गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या संशयावरून कारागृहातील १७ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली.