गोंडवाना विद्यापीठाची पहिली व्यवस्थापन व विद्या परिषद गठित

0
13

गडचिरोली, दि. ७: राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आज घेतलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयाद्वारे गोंडवाना विद्यापीठाची बहुप्रतीक्षित पहिली व्यवस्थापन व विद्या परिषद गठित केली आहे. यात नवनवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ३, पोटकलम(२) द्वारे प्रदान अधिकारान्वये शासनाने १३ ऑगस्ट २०१० च्या अधिसूचनेद्वारे गडचिरोली येथे गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्हयांसाठी गोंडवाना विद्यापीठ स्थापन केले आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेला साडेतीन वर्षे पूर्ण झाली असून, सर्वांना व्यवस्थापन परिषद(मॅनेजमेंट काँन्सिल) व विद्या परिषद(अकॅडेमीक काँन्सिल) गठित करण्याची प्रतीक्षा होती. त्याअनुषंगाने आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ११२(ब), २७(१) व २९(२) अन्वये पहिली व्यवस्थापन व विद्या परिषद गठित केली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु हे व्यवस्थापन परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. या परिषदेवर अधिष्ठाता गटातून डॉ.विवेक जोशी व कुलपतींनी नामनिर्देशित करावयाच्या व्यक्तींमध्ये डॉ.जीवन दोंतुलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक हे सदस्य असतील. प्राचार्यांच्या गटातून डॉ.मनोरंजन मंडल व डॉ.चंद्रशेखर कुंभारे, तसेच सिनेट सदस्य समीर केणे, विद्यापरिषदेच्या तीन सदस्यांमधून डॉ.राजेश गायधने, डॉ.राजेश चंदनपाट व डॉ.पी.अरुणप्रकाश आणि व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून डॉ.प्रतिभा जिवतोडे व स्वप्नील दोंतुलवार यांची वर्णी लागली आहे.
विद्या परिषदेचे(अकॅडेमिक काँन्सिल) अध्यक्ष म्हणून कुलगुरु असतील. या परिषदेवर विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.विवेक जोशी, डॉ.नंदाजी सातपुते, डॉ.चंद्रशेखर निखाडे, डॉ.अंजली हस्तक, डॉ.राजेश चंदनपाट, डॉ.झेड.ए.शेख, डॉ.जुगलकिशोर सोमानी, अभ्यास मंडळाचे सभापती म्हणून कला विद्या शाखेतून डॉ.परमानंद बावनकुळे, डॉ.शैलेंद्र शुक्ला, डॉ.पी. अरुणप्रकाश यांची वर्णी लागली आहे.समाज विज्ञान शाखेतून डॉ.रश्मी बंड, डॉ.राजेश गायधने, डॉ.जी.एस.तामगळे, डॉ.राजेंद्र मुद्दमवार, डॉ.पद्मा पांडे, डॉ.सतीश कन्नाके, डॉ.विशाखा कायंदे, डॉ.हंसा तोमर, डॉ.अनिल भोयर व डॉ.सुरेश खंगार यांची निवड करण्यात आली आहे. विज्ञान विद्या शाखेतून डॉ.मिलिंद देशपांडे, डॉ.मनोरंजन मंडल,डॉ.अभय साळुंखे, डॉ.विवेक भांदककर, डॉ.एस.एस. सिंगरु, डॉ.सी.पी. सिंगरु, डॉ.मृणाल काळे, डॉ.सुरेश बाकरे, डॉ.विजूताई गेडाम, शिक्षण विद्याशाखेतून डॉ.अशोक जिवतोडे व डॉ.दिलिप जयस्वाल, वाणिज्य शाखेतून डॉ.अनिल गिरिपुंजे, डॉ.श्रीराम गहाणे, अभियांत्रिकी शाखेतून डॉ.मनिष उत्तरवार, प्राचार्यांमधून डॉ.अशोक जिवतोडे, डॉ.राजेश चंदनपाट, डॉ.पी.अरुणप्रकाश, डॉ.मनोरंजन मंडल, डॉ.चंद्रशेखर कुंभारे, डॉ.एम.सुभाष, डॉ.हंसा तोमर व डॉ.एच.एन.पठाण यांना स्थान देण्यात आले आहे. महाविद्यालय व विद्यापीठ अभ्यास मंडळाचे संचालक हे पदसिद्ध सदस्य असतील. याशिवाय कुलगुरुंनी नामनिर्देशित करावयाच्या शैक्षणिक सेवा विभागातील एक प्रमुख किंवा संचालक म्हणून डॉ.मृणाल काळे, कुलपतींनी नामनिर्देशित केलेले उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित दोन तज्ज्ञांमध्ये डॉ.व्ही.एम.पांढरीपांडे व डॉ.आर.बी.मानकर यांची वर्णी लावण्यात आली आहे. याव्यतीरिक्त उच्च शिक्षण विभागाचे संचालक, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक हेदेखील विद्या परिषदेचे सदस्य असतील. व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून डॉ.श्रीकांत पाटील व डॉ.प्रतिभा जिवतोडे यांना घेण्यात आले आहे.