६ जून रोजी सीईओवर येणार अविश्वास

0
9

गोंदिया -जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य व पदाधिकाèयांनी जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप गावडे यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करीत त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्याची मागणी केली.या मागणीमुळे गोंदिया जि.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच सीईओविरुध्द अविश्वास ठराव पारित करण्यावर सदस्यांनी समंती दिल्याची घटना मंगळवारी घडली.परंतु सदर सर्वसाधारण सभा ही तहकूब सभा असल्याने सीईओविरुध्द अविश्वास ठराव घेता येणार नाही,असे सभेचे अध्यक्ष असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले.
तहकूब सभा होताच विविध विकास कामात खोळबां घालण्याचे काम सीईओ दिलीप गावडे,अतिरिक्त सीईओ जयवंत पाडवी आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम हे तिन्ही अधिकारी संघटितपणे करीत असल्याने जिल्ह्याच्या विकास रखडल्याचा मुद्दा काँगेसचे सदस्य डॉ.योगेंद्र भगत,भाजपचे सदस्य राजेश चतुर व सभापती मोरेश्वर कटरे,मदन पटले आदींनी उपस्थित केला.तसेच सीईओ यांनी विकासाला अडथळा निर्माण केल्याने आणि जिल्हा परिषदेचे प्रशासन त्यांना जमत नसल्याने त्यांना परत पाठविण्यासंबधी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.यावर उपस्थित सदस्यांनी परत पाठविण्याएैवजी अविश्वास ठराव घेण्याच्या मुद्दाला उपस्थित २६ सदस्यांनी सहमती दर्शविली.त्यावर जि.प.अध्यक्ष शिवणकर यांनी सदस्यांच्या भावना लक्षात घेत ६ जून रोजी सीईओ दिलीप गावडे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव घेण्यासंबधी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.त्यानुसार गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सीईओविरुध्द येत्या ६ तारखेला ठराव येणार आहे.सभेला उपाध्यक्ष मदन पटले,सभापती मोरेश्वर कटरे,प्रकाश गहाणे,कुसनलाल घासले ,सविता पुराम,सीईओ दिलीप गावडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.