जिल्ह्यात ५ हजार ५२० ठिकाणी होणार श्रींची स्थापना

0
7

गोंदिया,दि.१७- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे आज आगमन होत आहे. ढोलताशांच्या निनादात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणराज विराजमान होत आहे. केवळ गणेश मंडळ नव्हे तर घरोघरी गणरायाची भक्तीभावाने प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्‍ट्रासाठी पुढील दहा दिवस उत्साहाचे राहाणार आहे. मुंबईचा राजा मानल्या जाणाऱ्या गणेश गल्ली मंडळाच्या मूर्तीची भक्तीभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मुंबईच्या राजाचे शेकडो भाविकांनी पहिले दर्शन घेतले.मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली..विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी त्‍यांच्‍या घरी गणपती प्राणप्रतिष्‍ठा केली.महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रॉयल स्टोन या निवासस्थानी बसविलेल्या गणरायाची पूजा केली.
सकाळपासून पावसाने हजेरी लावली असली तरी श्री च्या स्थापनेसाठी नागरिकामध्ये मोठ्याप्रमाणात उत्साह दिसून येत होता.पावसातही मंडळासंह घरगुती गणेश नेण्यासाठी गर्दी दिसून येत होती.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाचे आज ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत ५ हजार ५२० गणेश मूर्तींची स्थापना होणार आहे. यात ९९० सार्वजनिक तर ४ हजार ५३० खाजगी गणेशमूर्तींचा समावेश आहे. गणेशोत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील ५१९ गावांनी पुढाकार घेतला असून येथे ‘एक गाव एक गणपतीङ्क संकल्पना राबविण्यात येत आहे. सकाळपासूनच श्रींची स्थापना करण्यासाठी सार्वजनिक मंडळांसह अनेक नागरिक गणेशमूर्ती खरेदी करून घरी नेतानाचे दृश्य बघायला मिळत होते.
सिद्धिविनायकाच्या पहिल्या आरती बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाने हजेरी लावली. तसेच अनेक सेलिब्रिटी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत आहेत.