झिंगानूर वन गोदामाला आग

0
10

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील वन विभागाच्या गोदामाला बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी आग लावली. यामध्ये चारचाकी वाहनासह इतर साहित्य जळून खाक झाले असून वन विभागाचे १२ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.झिंगानूर या गावात ४० ते ५० नक्षलवादी शिरले, वनविभागाच्या कार्यालयाकडे धाव घेत कार्यालयात घुसले. त्यावेळी १० ते १५ वनकर्मचारी होते मात्र सशस्त्र नक्षलवाद्यांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. नक्षलवाद्यांनी लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी कार्यालयात असलेल्या ३० ते ४० सिलेंडरचा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्यांनी कार्यालयात असलेली कागदपत्रे, संगणक आणि कार्यालया बाहेर असलेली टाटा सुमो गाडी जाळली. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी गावात पत्रके टाकली. वनविभागाचे कार्यालय जाळण्याची तीन महिन्यांतील ही पाचवी घटना आहे.