नागपूरात पोचले श्रीलकेंतील भगवान बुध्दांचे पवित्र अस्थी कलश

0
9

नागपूर,दि. १४ -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वी जयंती वर्षा निमित्ताने श्रीलंका येथील पुरातत्व विभागाने जतन करून ठेवलेल्या भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थी दर्शनासाठी नागपूर येथे आणल्या. आज बुधरवारला सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अस्थीकलशाचे आगमन झाले. या अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वित्त व वन मंत्री सुधिर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले,माजी आमदार अॅड. सुलेखाताई कुंभारे, आमदार मिलिंद मानेसह आबेंडकरी चळवळीतील नेते तसेच भंतेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. धम्मरथाद्वारे शहरात अस्थीकलशाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपल्यानंतर बेझानबाग येथील मैदानावर हे पवित्र अस्थिधातू जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.हे अस्थी विदर्भासह बालाघाट,रायपूर,भोपाल येथील जनतेला बघता यावे यासाठी यात्रेचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे.