नवीन चंद्रपूरसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करा- सुधीर मुनगंटीवार

0
7

नागपूर : नवीन चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी व जमिनीच्या अधिग्रहणासाठी आवश्यक निधीचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश वित्त आणि नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) दिले.

नागपूर येथील वन सभागृहात नवीन चंद्रपूरच्या विकासाबाबत आयोजित बैठकीत श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. झेंडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, म्हाडा नागपूरचे मुख्य अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह म्हाडाचे अधिकारी व नवीन चंद्रपूर येथील विकासक उपस्थित होते.