तुमखेडा खुर्द झाले विदर्भातील पहिले धुरमुक्त गाव

0
17
गोंदिया:- धुरयुक्त चुलींमुळे स्वयंपाक करणा-या महिला व कूटुंबातील व्यक्तींना प्रदुषणाचा सामना करावा लागतो. याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडतो ,धुरमूळे श्वसन विकार, दमा, खोकला, सर्दी व कर्करोगासारख्या गंभीर आजारांना बळी पडावे लागते. या बाबीकडे लक्ष देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत-सुंदर भारत, समृद्ध भारत या संकल्पनेला साकार करीत विर्दभातील पहिले प्रदुषणमुक्त, धुरमुक्त व चुलमुक्त गाव होण्याचा बहुमान गोंदिया जवळील ग्राम तुमखेडा खुर्द ला मिळाला आहे.इंडियन आॅईल कंपनीतर्फे चालविणार्या प्रसन्ना गॅसी एंजसीच्या माध्यमातून या गावात प्रत्येक घरात सीएनआर योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आला.
 इंडियन आॅईल कंपनीचे महाराष्टÑ व गोवा राज्याचे जनरल मॅनेजर बी.के सिंग यांच्या हस्ते १७ फेब्रुवारीला एका कार्यक्रमांत गॅस सिलेंडर व शेगडी वाटप करण्यात आले.एलपीजी गॅस कंपन्यांना करिता नवीन पॉलीसी निर्माण करून प्रत्येक घरी एलपीजी कनेक्शन देण्याचे धोरण ठरविण्यात आले. यात बीपीएल व सर्वसामान्य कुटुंबांची निवड करण्यात आली. त्यांना सोयीच्या दरात तसेच ईएमआय च्या माध्यमातून कनेक्शन देण्यात आले आहे. गोंदिया येथील प्रसन्न इंडेन कंपनी तर्फे गोंदिया जवळील ५०० घरे असलेल्या तुमखेडा खुर्द गावाची निवड करण्यात आली. या गावी पूर्वी 300 घरात गैस कनेक्शन होते. उर्वरित 200 घरांचा एलपीजी मित्रांच्या तर्फे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार उर्वरित 190 घरांना गॅस कनेक्शन चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात तुमखेडा खुर्द गावचे उपसरपंच प्रल्हाद लिल्हारे यांना सदर गाव चुलमुक्त व धुरमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र इंडियन आॅईल कंपनीचे महाराष्टÑ व गोवाचे जनरल मॅनेजर बी.के सिंग यांना दिले. याप्रसंगी इंडियन आॅईल कंपनीचे  पी.के.मिश्रा,संजीव रॉयली, उपसरपंच प्रल्हाद लिल्हारे, संजीव माथुर, मनोज पाठक, प्रसन्ना एसंजीचे वितरक प्रसन्न ढोक,संजय खोब्रागडे आदी उपस्थित होते.