नाथजोगी वस्तीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

0
14

गोंदिया,दि. १८ : अदासी येथे आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आले असता त्यांनी नाथजोगी वस्तीला भेट देऊन पाहणी केली. नाथजोगी समाजातील नागरिक व महिलांशी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. महिलांनी काही कुटीर उद्योगाची निवड करावी तसेच त्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी तसेच मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याचेही पालकांना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, वरिष्ठ शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र जैन, अनिल देशमुख, तहसिलदार संजय पवार, दुलीचंद बुध्दे, लिलाधर पाथोडे, जीवन लंजे यांची उपस्थिती होती.