वडेगाव सेवा सहकारी सदस्यांचा सत्कार

0
15

तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात वडेगाव येथील झालेल्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलचे १३ पैकी १२ सदस्य निवडून आले. त्यांचा सत्कार माजी आ. भजनदास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे, कृउबासचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, पं.स. सदस्य बी.एस. रहांगडाले, भूमेश्‍वर रहांगडाले, सुनील बन्सोड, पं.स. सदस्य रमनिक सोयाम, गौरी पारधी, डिलेश पारधी, पोलीस पाटील हंसराज रहांगडाले, तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, बबलू रहांगडाले उपस्थित होते.
वडेगाव येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पार पडली असून ही संस्था भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी असून १३ गावांचे सदस्य या संस्थेत आहेत. परिसरातील नागरिकांचे लक्ष याकडे लागले होते. पूर्वीचे काँग्रेस पॅनलचे सर्व पराभूत होवून भाजपचे १२ व एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला.भाजप पॅनलच्या उमेदवारांमध्ये तेजराम चव्हाण, विष्णूपंत बिंझाडे, मूलचंद रहांगडाले, हिरालाल ठाकरे, रामकृष्ण शेंदरे, शिवलाल बिसेन, पुरूषोत्तम बघेले, रविकांता ठाकरे, राधेश्याम सोनेवाने, लक्ष्मण खोब्रागडे, जसवंता गौतम, योगराज ठाकरे यांचा समावेश असून त्यांचा अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.संचालन भाऊराव कठाणे व प्रास्ताविक उमाकांत हारोडे यांनी केले. आभार डॉ. रामप्रसाद पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी तालुका महामंत्री पिंटू रहांगडाले, सुधीर मेश्राम, सलाम शेख, बबलू रहांगडाले, प्रीतम रहांगडाले, सुनील येरपुडे, डिगंबर ढोक यांनी सहकार्य केले.