ओबीसी संघर्ष कृती समितीच्या धरणे आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

0
19

गोंदिया- २८ मार्च रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक शब्दांचा वापर तसेच नाशिक येथील सभेत तेली समाजाबद्दल अपशब्द काढणारे ना.गिरीष महाजन यांना मंत्रीमंडळातून बरखास्त करण्याच्या मागणीला घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित ओबीसी संघर्ष कृती समितीच्या धरणे आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद ओबीसी समाजासह जनतेकडून मिळाला.
२८ मार्च रोजी सदर घटना  घडल्यानंतर मागील ३ एप्रिल रोजी नागपूर येथे विभागीय पातळीवरील बैठकीत आज ७ एप्रिल रोजी विर्दभातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करून निवेदन देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहु महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून धरणे आंदोलनाला सुरवात करण्यात आली.या धरणे आंदोलनाला ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बबलू  कटरे,उपाध्यक्ष मनोज मेंढे, कार्याध्यक्ष अमर वराडे,सचिव खेमेन्द्र कटरे,नामदेव किरसान, प्रा.एच.एच.पारधी,समता परिषदेचे राजेश नागरिकर,बसपचे सुनिल भरणे, शिव प्रतिष्ठानाचे दुर्गेश रहांगडाले,युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाअध्यक्ष जितेश राणे,ओबीसी सेवा संघाचे करमरकर,तेलीमहासभेचे उमेन्द्र भेलावे,ओबीसी कृती समिती तिरोड्याचे नरेन्द्र रहांगडाले,सडक अर्जुनीचे मधु दोनोडे,राजू पटले, अर्जुनी मोरगांवचे उद्धव मेहंदळे,बालू बडवाईक,रतीराम राणे, देवरीचे कृष्णा ब्राम्हणकर,धनराज हुकरे, सालेकसाचे डॉ.संजय देशमुख, गोरेगांवचे डॉ.विवेक मेंढे, जि.प.सदस्या सरिता कापगते यांनी संबोधित केले तसेच सामाजिक न्यायमंत्री यांनी ओबीसी समाजाबद्दल काढलेल्या अपशब्दाबद्दल निषेध व्यक्त करून ओबीसीच्या न्याय मागण्यांना समर्थन देवून प्रसंगी रस्त्यावर येण्याचा इशारा देण्यात आला.

धरणे आंदोलनाला मनीष मुनेश्वर,आशिष नागपूरे,कैलाश भेलावे,नंदकिशोर मेश्राम,शिशिर कटरे,योगराज उपराडे,अंचल गिरी,मनोज कटकवार,राजेश चौरे,गौरव बिसेन,शालीकराम,राजू काळे, हातझाडे,धनलाल ठाकरे,मिलिंद समरीत,एम.जी.येडे,विद्याकुमार बहेकार,संतोष खोब्रागडे,बाबा बहेकार,डी.एल.पाटील,प्रकाश अगळे,कृपाल लांजेवार,पी. डी. चव्हाण,भास्कर येरणे,मनोज शरणागत,गजानन देशकर, अभिषेक चुटे,राधेश्याम‘ भेंडारकर, दिनेश लिल्हारे,नरेन्द्र बोहरे, एस. डी. लहाने,खुमेश कटरे,सावन कटरे,भ्नतराज भेलावे,मुकेश पाटील,प्रेमलाल गायधने,अशोकसिंह गौतम,बबलू लिल्हारे,डॉ.वि.टी.येळे, मधुसुदन दोनोडे,बबलू बिसेन,धनराज बोपचे,श्रीराम मुनेश्वर,संतोष शिवणकर,विजय रहांगडाले,मनोज लुटे,तारेन्द्र चौधरी,विनय रहागंडाले,सजिव रहागडाले,प्रमोद भोयर,होमेंद्र कटरे,विनायक येडेवार, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर,मनोहर चंद्रिकापुरे,श्रीमती दुर्गा तिराले,अविनाश काशीवार,बंशीधर लंजे रमेश झळे,हरिष राऊत,सुनिल बिसेन,रमेश चुटे,वैभव हेमने,भाष्कर हेमने,नरेश कुंजाम,चंद्रपाल रहागंडाले,रघुदास नागपूरे,अशोक पडोळे,गणेश बरडे,गजानन देशकर,प्रकाश अगळे,रोशनलाल चौरीवार,अभिषेक चुटे,गुणाराम मेहर,अजय नागरीकर,नरेंद्र चौधरी,टेकेश चौधरी,योगराज मेहरतसेच आमगांव,सालेकसा,देवरी,अर्जुनी मोर,सडक  अर्जुनी,गोरेगांव व तिरोडा येथील ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.धरणे आंदोलन c‘ंडपात काङ्र्मक्र‘ाचे संचालन सुनील पटले ङ्मांनी तर आभार गणेश बरडे गुरूजी ङ्मांनी ‘ानले.