ओबीसी संघर्ष कृती समितींने निवेदनातून केली मंत्र्याच्या राजीनाम्यासह वानखेडेंच्या निलबंनाची मागणी

0
21

गोंदिया- २८ मार्च रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक शब्दांचा वापर तसेच नाशिक येथील सभेत तेली समाजाबद्दल अपशब्द काढणारे ना.गिरीष महाजन यांना मंत्रीमंडळातून बरखास्त करण्याच्या मागणीला घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आयोजित ओबीसी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन दिले.
निवेदनातील मागण्यात सामाजिक न्याय मंत्री व गिरीष महाजन यांना मंत्रीमंडळातुन हटविण्यात यावे,गोंदिया जिल्ह्यातील शिष्यवृत्तीची रक्कम कालावधीपूर्वीच शासनाला परत पाठविणारे विशेष जिल्हा समाजकल्याण विभागाचे उपायुक्त मंगेश वानखेडे यांना निलंबित करण्यात यावे,ओबीसी जनगणणेची आकडेवारी जाहीर करून लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये तरतुद करण्यात यावी. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून घटनेच्या ३४० व्या कलमानुसार शेड्युल तयार करण्यात यावे.नॉन क्रिमिलेअरची असंवैधानिक अट रद्द करण्यात यावी,भारत सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती राज्यसरकारने १००० ट्क्के द्यावी,लोकेश येरणे या विदथ्याच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करण्यात यावी.तालुकास्तरावर ओबीसी विद्याथ्यासाठी वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता.धरणे आंदोलन ‘ंडपात काङ्र्मक्र‘ाचे संचालन सुनील पटले ङ्मांनी तर आभार गणेश बरडे गुरूजी ङ्मांनी ‘ानले. धरणे आंदोलनाला मनीष मुनेश्वर,आशिष नागपूरे,कैलाश भेलावे,नंदकिशोर मेश्राम,शिशिर कटरे,योगराज उपराडे,अंचल गिरी,मनोज कटकवार,राजेश चौरे,गौरव बिसेन,शालीकराम,राजू काळे, हातझाडे,धनलाल ठाकरे,मिलिंद समरीत,एम.जी.येडे,विद्याकुमार बहेकार,संतोष खोब्रागडे,बाबा बहेकार,डी.एल.पाटील,प्रकाश अगळे,कृपाल लांजेवार,पी. डी. चव्हाण,भास्कर येरणे,मनोज शरणागत,गजानन देशकर, अभिषेक चुटे,राधेश्याम‘ भेंडारकर, दिनेश लिल्हारे,नरेन्द्र बोहरे, एस. डी. लहाने,खुमेश कटरे,सावन कटरे,भ्नतराज भेलावे,मुकेश पाटील,प्रेमलाल गायधने,अशोकसिंह गौतम,बबलू लिल्हारे,डॉ.वि.टी.येळे, मधुसुदन दोनोडे,बबलू बिसेन,धनराज बोपचे,श्रीराम मुनेश्वर,संतोष शिवणकर,विजय रहांगडाले,मनोज लुटे,तारेन्द्र चौधरी,विनय रहागंडाले,सजिव रहागडाले,प्रमोद भोयर,होमेंद्र कटरे,विनायक येडेवार, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर,मनोहर चंद्रिकापुरे,श्रीमती दुर्गा तिराले,अविनाश काशीवार,बंशीधर लंजे ,रमेश झळे,हरिष राऊत,सुनिल बिसेन,रमेश चुटे,वैभव हेमने,भाष्कर हेमने,नरेश कुंजाम,चंद्रपाल रहागंडाले,रघुदास नागपूरे,अशोक पडोळे,गणेश बरडे,गजानन देशकर,प्रकाश अगळे,रोशनलाल चौरीवार,अभिषेक चुटे,गुणाराम मेहर,अजय नागरीकर,नरेंद्र चौधरी,टेकेश चौधरी,योगराज मेहर तसेच आमगांव,सालेकसा,देवरी,अर्जुनी मोर,सडक  अर्जुनी,गोरेगांव व तिरोडा येथील ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.