महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

0
11

 मुंबई, दि. 7 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनानिमित्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाराणा प्रतापसिंह यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद
तावडे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा
मुंडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य
सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव पी.एस.मीना, सामान्य प्रशासन
विभागाचे सचिव बी.आर.जाधव यांनी गुलाबपुष्प वाहून महाराणा प्रतापसिंह
यांना अभिवादन केले.

            सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव आर.एम.जाधव, अवर सचिव
रविकांत पांचाळ, कक्ष अधिकारी रा.मो.गोसावी, कक्ष अधिकारी राजेश वडनेरकर,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी अमित पालवे तसेच मंत्रालयातील
अधिकारी कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन केले.