नगराध्यक्ष जायस्वाल कार्यालय तोडफोड प्रकरणात चौघांना न्यायालयीन कोठडी

0
4

गोंदिया-काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिलरोजी झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेध नोंदविण्यासाठी गोंदिया शहरात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या दुसर्यादिवशीच्या मोच्र्या दरम्यान तसेच घटनेच्यादिवशी काँग्रेसच्या काही युवकांनी नगराध्यक्ष कशीश जायस्वाल यांचे कालेखा चौकातील कार्यालयाची तोडफोड केली होती.तोडफोडप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आमदार पुत्र व भंडारा गोंदिया लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल यांच्यासह ९ जमांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.त्यापैकी प्रफुल अग्रवाल अद्यापही पोलीसांच्या हाती लागले असून अटक करण्यात आलेल्या दिपल अग्रवाल,दिपक मालगुजार,आलोक मोहंती आणि संदीप रहगाडाले यांना ६ जून रोजी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायाध्याीश पी.डी.भोसले यांच्या सहदिवाणी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.आज त्याना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान त्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.याप्रकरणात अद्याप प्रफुल अग्रवाल यांना अटक करम्यात आलेली नाही.