खा.पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त शेतकèयांचा सत्कार

0
10

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. नाना पटोले यांच्या रविवारी रोजी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना खा.पटोले म्हणाले की, आपला विभाग शेतीप्रधान आहे. त्यामुळे शेतकèयांसाठी सिंचनाची सोय करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. शेतकèयांना दुष्काळ पीकविमा उपलब्ध करून देणे सुध्दा महत्वाचे आहे.त्यासाठी कुठल्याही अधिकाèयाची गरज राहणार नाही. त्वरित विमा कंपनीचे अधिकारी पाहणी करून विम्याची रक्कम अदा करतील.
आज विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी संशोधन हे पूर्वीच संत महंतानी लावून ठेवले आहे. तेव्हा संतावर टीका न करता त्यांचा आदर सत्कार करायला हवा असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्यानिमित्ताने ९ तालुक्यातील अधिक उत्पन्न घेणाèया शेतकèयांचा खा.नाना पटोले यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना खा. पटोले म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार शेतकèयांच्या हितासाठी अनेक योजना गावापर्यंत पोहवितात. परंतु, बँॅकेचे अधिकारी त्यांना नाना प्रकारचे कागदपत्र सांगून वेळ काढू धोरण अंमलात आणताना दिसतात. त्यांच्याकडे जातीने लक्ष देण्याची आपण ठरविलेआहे.
कारण, विजय माल्यांला कोट्यवधी रुपये देताना कुठलेच प्रकारचे कागदपत्र व पुर्ततता न करता देण्यात येते तर मग शेतकèयांना का नको असे उदाहरण देवून त्यांनी स्पष्ट केले.
खा. नाना पटोले यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी खौसे महाराज, गुरूकुंज मोझरीचे र्जनादनपंथ बोथे, प्रचारप्रमुख पाटील गुरूजी, प्रकाश वाघ महाराज, आ.बाळा काशीवार, विनोद पटोले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. दीपक मेंढे, किरण धोटे अमरावती, वंदना पटाले,हभप.फलहारी महाराज, इंजोरीकर, उपसभापती लखनलाल बर्वे, दामोदर नेवारे, अशोक चांडक, राजू पालीवाल,जगदिश येडे,कशिश जायस्वाल,सुनिल केलनका,विनोद नाकाडे,प्रकाश गहाणे,रचना गहाणे,खुमेंद्र मेंढे,बंटी पंचबुध्दे,जयंत शुक्ला,भामा चुर्हे,भालचद्रं ठाकुर, सरपंच शारदा मेश्राम, वेणूगोपाल शेंडे, झामसिंग येरणे, सुरेश भेंडारकर, राजेश खोटेले, टॉनिक भेंडारकर, पाकमोडे आदी उपस्थित होते.