१४ ते २0 नोव्हेंबरपर्यंत सहकार सप्ताह

0
12

गोंदिया,दि.09 : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघामार्फत दरवर्षी १४ ते २0 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात ६३ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सहकार सप्ताहाचे उदघाटन १४ रोजी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सहकार क्षेत्नातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
दि.१४ रोजी नागरी सहकारी बँकाबाबत कार्यशाळा, १५ ला नागरी/ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांबाबत कार्यशाळा, १६ ला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बसबत कार्यशाळा, १७ नोव्हेंबर- सहकारी गृहनिर्माण संस्था व पणन सहकारी संस्थाबाबत कार्यशाळा, १८ ला औद्योगिक सहकारी संस्थांबाबत कार्यशाळा, १९ ला प्रक्रि या सहकारी संस्थांबाबत कार्यशाळा, २0 रोजी दुग्ध व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाबाबत कार्यशाळेचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक र्मया. गोंदिया येथील सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत दररोज त्या-त्या संस्था गटातील दोन यशस्वी सहकारी संस्थांच्या यशोगाथेचे सादरीकरण, संबंधित क्षेत्नातील तज्ज्ञांचे मार्गदर्शक तसेच संस्थागटातील समस्या, त्यावरील उपाययोजना आणि भविष्यातील नियोजन अशी कार्यक्रमाची रुपरेषा राहणार आहे.
या कालावधीत विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व सभासदांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून कार्यक्र माचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले आहे.