पोलीस जवानाने १३ दिवसात पुर्ण केला २४०० किमीचा खडतर प्रवास

0
18
प्रतिनिधी/ १ जुलै
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात सी-६० पथकात कार्यरत असलेले पोलीस जवान किेशोर गोपालादास खोब्रागडे यांनी जगातील सर्वात उंच आणि अवघड रस्त्यावरून बाईक राईडिंग करून गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले आहे. किशोरने  जगातील सर्वात उंच असलेले खारडोंगला रोड (१८,३८० पुâट), तालंगला रोड (१७,५८२ पुâट), चांगला रोड (१७,५६६ पुâट), हे ठिकाण अवघ्या १३ दिवसात २४०० किलोमीटरचा प्रवास प्रतिकुल परिस्थतीवर मात करत रॉयल इन फिल्ड बाईकवर पुर्ण करीत गडचिरोली पोलीस दलाचे नाव झळकविले आहे.
गडचिरोली पोलीस जवान हे नक्षलवाद संपविण्यासाठी अथक परिश्रम घेतात. प्रसंगी त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. आदिवासी व नक्षलग्रस्त भाग तसेच अनेक दैनंदिन समस्यांशी लढा देत किशोर खोब्रागडे हा सन २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाला. त्याने सी-६० पथकात सामील होवून नक्षल्यांमध्ये आपला दरारा निर्माण केला.
 नक्षविरोधी अभियानामध्ये दररोज पहाडी , जंगल, नद्या, नाले तुडवतांना आपणही काहीतरी साहस करावे, असा विचार किशोरच्या मनात येत असे. सन २०१३ मध्ये  उत्तर भारतात फिरत असतांना या भागातील निसर्ग सौंदर्य व या सौंदर्यास थरारक रूप देणारे रस्ते पाहून आपण जगातील सर्वात उंच रस्त्याने दुचाकीने प्रवास करावेत हे त्याने मनोमन ठरविले.  तो हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडत होता.  अखेर आज त्याचे स्वप्न पुर्ण झाले.  हिमवादळ, रक्त गोठवणारी थंडी, बर्र्फाच्छीत रस्ते, १५ अंश सेल्सीअस तापमान, एका बाजूला पहाडी तर दुसNया बाजूला  जीवघेणी खोल दरी अशा प्रतिकुल परिस्थीतीवर मात करून प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर किशोर खोब्रागडे या पोलीस जवानाने  केवळ जिल्ह्याचे नाव झळविले.जिंकण्याची खरी इच्छाशक्ती असेल तर तुमची स्वप्ने पुर्ण होवू शकतात हे किशोरने या घटनेवरून दाखवून दिले आहे.