सरकारने गरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले -बड़ोले

0
7
गोंदिया दि. 1, – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील तीन वर्षात राबविलेल्या अनेक योजना व घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे देशातील गरीब, मजूर, शेतकरी, पीड़ित, शोषित, वंचितांना न्याय मिळाला असून जगात देशाचे नावलौकीक झाले आहे. गरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणन्याकरीता केंद्र व राज्य सरकार निरंतर कार्य करीत आहे. उज्ज्वला योजनेतून देशात २ कोटी व जिल्ह्यात ३६ हजार गरीब कुटुंबियांना गैस कनेक्शन देऊन चुलीच्या धुरापासुन मुक्ति मिळाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बड़ोले यांनी केले.
ते येथील पोवार सांस्कृतीक सभागृहात ३० जून रोजी भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड व भारतीय जनता पार्टीच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमात बोलत होते. या वेळी प्रामुख्याने आ विजय राहंगडाले, आ संजय पुराम, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ. हेमंत पटले, माजी खासदार डॉ खुशाल बोपचे, माजी आ. केशवराव मानकर, जिप माजी अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा रचना गहाणे, तिरोड़ा नगराध्यक्षा सोनाली देशपांडे, भारत  पेट्रोलियमचे स्टेट हेड शुभांकर सेन, जिल्हा परिषद सभापती देवराज वड़गाये, छाया दसरे, भाजपा संघटन महामंत्री वीरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, न प उपाध्यक्ष शिव शर्मा, सभापती घनश्याम पानतावने, भावना कदम, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, सीताबाई रहांगडाले, भाजपा संपर्क प्रमुख संतोष चौहान, संजय कुलकर्णी, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश सचिव अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, भारत  पेट्रोलियमचे क्षेत्रीय प्रबंधक समीर डांगे, एलपीजीचे क्षेत्रीय प्रबंधक महेश जंगम, रतन वासनिक, हनुवत वट्टी, अल्ताफ हमीद आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील १० महिलांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. तर केंद्र शासनाच्या ३ वर्षाच्या कामाची चित्रफीती उपस्थितांना दाखविण्यात आले. याप्रसंगी आदीवासी लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन जयंत शुक्ला यांनी तर उपस्थितांचे आभार शुभांकर सेन यांनी मानले. यावेळी मोठ्यासंख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते.