आदिवासी भागातील दल्लाटोल्याच्या शाळेत सीईओंनी साजरा केला बालदिवस

0
10

गोंदिया,दि.14ःगोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील पुर्णंत शंभरटक्के आदिवासी गाव असलेल्या शेवटच्या टोकावर जंगलव्याप्त पहाडांनी वेढलेल्या दल्लाटोला या दुर्गंंम गावातील शाळेला आज मंगळवारला भेट देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालगोपाल विद्यार्थ्यांसोबत राहून साजरी केली.विशेष म्हणजे यापुर्वी सुध्दा एवढ्या आतील शाळेला त्यांनी भेट दिली होती.त्यानंतर आज बालदिनाचे औचित्यसाधून त्या शाळेला भेट देत मुलांना बिस्कीट,चाॅकलेट व फळांचे वितरण केले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.देवेंद्र पातुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डाॅ.सतिश जायस्वाल,बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे, जमाकुडो आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.दोन शिक्षकी असलेल्या शाळेत एक शिक्षक कार्यरत अाहे.पटसंख्या कमी असली तरी विद्यार्थी हिंदी भाषेत चांगल्याने बोलून पाढे बोलण्यातही हुश्शार असल्याचे बघावयास मिळाले.या शाळेला उच्चअधिकारी म्हणून भेट देणारे सीईओ ठाकरे हे पहिले अधिकारी ठरले असून शिक्षणाधिकारी सुध्दा त्या शाळेपर्यंत अद्याप पोचलेले नाहीत.