जखमी बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

0
7

कुरखेडा,दि.23 – गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातंर्गतच्या मालेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत कामेली परिसरात मागील तीन दिवसांपासून गावाभोवती घिरट्या घालणार्या, अशक्तपणामुळे जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याला वनविभागाच्या चमूने मोठ्या शिताफीने आज २३ डिसेंबरला जेरबंद केले. जखमी बिबट्याला उपचाराकरीता कुरखेडा वन आगारात हलविण्यात आले आहे.माहितीनुसार मालेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया कोरची तालुक्यातील कोटगूल उपक्षेत्रातील कामेली गावाशेजारील जंगलात तीन दिवसांपासून अशक्य व जखमी अवस्थेतील अंदाजे दीड वर्षे वयाचा बिबट फिरत असल्याची माहिती गावकºयांनी वनविभागाला दिली होती. या माहितीच्या आधारे मागील तीन दिवसांपासून उपवन क्षेत्र वडसा येथील सहाय्यक वनसंरक्षक कैदलवार व कांबळे यांच्या नेतृत्वात पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर, मालेवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेवार, गडचिरोलीचे मानद वन्यजीव संरक्षक उदय पटेल व वनविभागाची चमू या परिसरात या जखमी बिबट्याच्या मागावर होती.आज दुपारी कामेली या गावाजवळ तो निदर्शनास येताच वनविभागाच्या चमूने दुपारी १ वाजताच्या सुमारास मोठ्या शिताफीने गावाबाहेर एका निर्जन घरात कोंडले. यानंतर त्याला पिंजºयात जेरबंद करीत कुरखेडा वन आगारात हलवून पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या चमूने प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी त्याला गोरेवाडा(नागपूर) ला हलविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.