काशीराव माहूरे वयाच्या 66 व्या वर्षी एल.एल.बी.ची परिक्षा उत्तीर्ण

0
16

अमरावती,दि.२३ : शहरातील आशियाड कॉलनी येथील रहिवासी काशीराव उकंडराव माहुरे यांनी वयाच्या 66 व्या वर्षी एलएलबी (कायद्याची पदवी ) पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल समाजातील सर्वचस्तरावरील नागरिकांनी त्यांचा गौरव केला आहे.  माहुरे हे बँक ऑफ महाराष्ट्र गाडगेनगर शाखेचे उपप्रबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कायद्याच्या संदर्भातील ज्ञानाचे ध्येय गाठून तरुण पिढीला लाजविणारे, असे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या आश्चर्यकारक यशात सर्व मित्रमंडळींनी तसेच अर्धांगीणी, मुली व जावाई यांचा सिंहाचा वाटा होता.डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, विषयांचे प्राध्यापक व कर्मवारी वृंद यांनी अमुल्य मार्गदर्शन करुन या यशाचे शिखर गाठण्यास सहकार्य केल्याबदद्ल त्यांनी सर्वाचे आभार मानले.त्यांनी हे अतुलनीय यश जिद्द, धडपड, चिकाटी व प्रामाणिकपणा यागुणांमुळे प्राप्त केंले आहे.त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील रहिवाशी, मित्रगण आदींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे