बावंनथडी प्रकपाचे अधिकारी घरबसल्या शासनाला लावतात लाखोचा चुना 

0
42
 सालई खुर्द शेत शिवारात प्रकार
मोहाडी,( नितीन लील्हारे ),,दि.२३-: मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द शेत शिवारात बावनथडी प्रकल्प अंतर्गत शेत शिवारातून नाली खोदकाम, सिमेंट वॉल, तसेच कालव्यावर माती मुरूम टाकने कामे करण्यात येत असून कामात अनियमितता आढळून येत आहे. तरी बावनथडी प्रकल्पाचे अधिकारी यांना सदर प्रकरणांची माहीत देऊनही सदर प्रकरणांकडे दुर्लक्ष करीत घरबसल्या शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याचा प्रकार सालई खुर्द शेत शिवारात दिसून येत आहे.
 शेतकऱ्यांना पुरे पुर पाणी मिळावे याकरिता शेतातून नाली खोदकाम, सिमेंट वॉल व कालव्यावर माती मुरूम टाकण्यात येते. परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे दिसून येते.शेतातून सर्व शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळावे यासाठी सोयी सुविधा शासनाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.नाली खोदकाम करण्यात येते परंतु ही नालीची रुंदी व खोलीकरण अर्धा फूटही नशून नाली खाल उंच करण्यात आली आहे व काही ठिकाणावरून नाली पूर्ण भुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते. अशा प्रकारे नाली तयार करून उलट शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. अशा बेकायदेशीर नालीचे उपयोग काय होणार अशा प्रश्नन शेतकऱ्यांना पडत आहे. कमीत कमी दीड ते दोन फूट नाली असणे गरजेचे आहे तेव्हाच शेतकऱ्यांना पाणी मिळेल, शेतात पाणी जाण्यासाठी जागो जागी नालीमध्ये सिमेंट चे वॉल तयार करण्यात आले असून हे वॉल
दीर्घकालीन नसून तात्पुरते आहे, त्यामुळे महिन्याभरातच तुड फूट होणार असल्याचे चित्र आतापासून दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी नाली खोदकामात, सिमेंट वॉल, तसेच माती मुरूम कामात अनियमितता होत असल्याचे बावंनथडीचे कनिष्ठ अभियंता हटवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावरही कामात सुधारणा करण्यात आली नाही. सदर काम खोब्रागडे ठेकेदार करत असल्याने अधिकारी कडून पाठराखण होत असल्याचे दिसून येते.
बावंनथडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी वाघमुळे  यांच्या निदर्शनास आणून  दिल्यावरही बांधकाम बंद, कामाची चौकशी किवा सुधारणा करण्यात सुध्दा आली नाही.  बावंनथडी विभागामार्फत होत असलेले सिमेंट नालीवरती वॉलच्या बांधकामात १० वाळूचे टोपले व १ गिट्टी टोपल्यांच्या मिश्रणामध्ये मातीमिश्रित करून केवळ अर्धा घमील सिमेंट वापरून बोगस काम होत असल्याचे शेतकरी अाेरडत आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बावंनथडी प्रकल्पाने खालच्या टोकापर्यत बावनथडी प्रकल्पाचे शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी उपाय योजना करण्यात आल्या. शेतकऱ्याना पाणी मिळावे म्हणून सरकार बावनथडी  प्रकल्पावर कोट्यवधीचा निधी खर्च करत आहे परंतु ह्या पैशाचा पूर्ण पणे गैर प्रकार होत असून शेतकऱ्याच्या हिताचे काम कोणी करावे अशा प्रश्नन सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक श्रमदानाच्या कामात घाम गाळत अाहेत, तर दुसरीकडे तुमसर बावंनथडी प्रकपाचे अधिकारी घरबसल्या शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याचे प्रकार सालई खुर्द शेत शिवारात दिसून येत आहे. अधिकारी व संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांचे काही न एेकता आपल्या मन मर्जीने शेतकऱ्याच्या शेतातून खोदकाम करत आहे. वरिष्ठ अधिकऱ्यांनी लक्ष देऊन कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.