‘जनस्थान’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना प्रदान

0
22

नाशिक – ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना आज कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकच्यावतीने दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे नाशिकमध्ये वितरण झाले. एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकच्यावतीने आज कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर करण्यात आला होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला जब्बार पटेल उपस्थित होते