‘बेळगाव’च्या महापौरपदी किरण सायनाक, उपमहापौरपदी मीना वाझ

0
34

बेळगाव -महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी भाषिक गटाने वर्चस्व मिळविले. किरण सायनाक यांची महापौरपदी, तर मीना वाझ यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
बेळगाव महानगरपालिकेवर मराठी झेंडा फडकला आहे. बेळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी गटाच्या किरण सायनाक आणि मीना वाझ यांनी कन्नड गटाच्या रमेश सोनटक्की आणि जयश्री मलगी यांना पराभवाची धूळ चारली. मराठी भाषिक गटाच्या एकजुटीमुळे सायनाक यांच्या पारडय़ात सर्वाधिक ३२ मते पडली.