शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण तातडीने करा – पालक सचिव मीना

0
31

गोंदिया, दि.७ : जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकèयांना शासनाकडून लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. शेतपिकांच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे तातडीने सवेक्षण करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव पी.एस.मीना यांनी दिले.(ता.७) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा सभेत पालक सचिव मीना बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील स्वाईन फ्लू स्थिती आणि जलयुक्त शिवार अभियानाचा देखील आढावा घेतला.
सभेला जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी श्री.सोरमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त सुरेश पेंदाम यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालक सचिव मीना म्हणाले, नुकसानीचे सवेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षण करतांना संबंधित शेतकèयांचे आधारकार्ड क्रमांक व त्यांचे बँकखाते क्रमांकांची माहिती सुद्धा संकलीत करावी. हरभरा व लाखोरी पिकाचे जिल्ह्यात जास्त नुकसान झाल्याचे पाहणी केली असता निदर्शनास आल्याचे पालक सचिवांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काम करावे. माजी मालगुजारी तलावांचे सर्वेक्षण करुन त्यांची मोजणी करावी. तलावाच्या भागात किती हेक्टर जमिनीवर किती शेतकरी रब्बी पिके घेतात याची माहिती सुद्धा संकलीत करण्याची त्यांनी सांगितले.जिल्ह्यात स्वाईन फ्लू या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी असे सांगून पालक सचिव मीना म्हणाले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून जिल्ह्यातील स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार निर्मीती कशी होईल यादृष्टीने लक्ष द्यावे असे सांगून पालक सचिव मीना म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनस्थळी येणाèया पर्यटकांसाठी शौचालय व मुतारीची व्यवस्था असावी व त्याची देखभाल व्यवस्थितपणे केली जावी. वन्य प्राण्यांना पाणवठ्यावर पुरेशे पाणी उपलब्ध होण्यासाठी सौर ऊर्जेवरील पंप लावावे. त्यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेणार नाही असेही पालक सचिव यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.सैनी यांनी जिल्ह्यातील ३०० गावातील १८६८४ शेतकरी बाधीत झाले असून २१४२ हेक्टरवरील लाखोरी पिकाचे, १६४० हेक्टरवरील हरभरा पिकाचे, १११८ हेक्टरवरील जवस पिकाचे, ४८५ हेक्टरवरील गहू पिकाचे, २९८ हेक्टरवरील भाजीपाला पिके, ३७.८० हेक्टरवरील फळ पिके आणि १५४ हेक्टरवरील इतर पिकांच्या अशा एकूण ५८७५.५५ हेक्टरवरील २ कोटी ६५ लक्ष ८५ हजार रुपयांचे शेतपिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील ७७ ग्रामपंचायती अंतर्गत ९४ गावांची निवड करण्यात आली असून ९१ कामे सुरु आहे. यामध्ये भात खाचरे दुरुस्ती, शेततळे, साठवण बंधारे, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांधकाम, तलाव दुरुस्ती, नाला सरळीकरण व तलाव खोलीकरणाच्या कामाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.कुरील यांनी यावेळी दिली.स्वाईन फ्लू या आजाराबाबत जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात २ रुग्ण दगावले असून गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय येथून ५० रुग्णांचे थ्रोट सॉबचे नमूने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. १ रुग्ण पॉझीटीव्ह आढळल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती केले असून त्या रुग्णाकडे वेळोवेळी लक्ष देण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. व्हॅक्सीन व टॅमीफ्लू औषधे रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी दिली.यावेळी जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-१५ याबाबतचा आढावाही पालक सचिवांनी घेतला. यावेळी त्यांनी मार्चपूर्वी सर्व निधी संबंधित यंत्रणांनी खर्च करावा असे निर्देशही पालक सचिवांनी दिले.