विधीमंडळातील प्रश्नोत्तराच्या तासाचं थेट प्रक्षेपण

0
8

मुंबई : विधीमंडळाचा कारभार थेट जनतेला पाहता यावा यासाठी सरकारनं एक पाऊल उचललं आहे. लोकसभा आणि राज्यसभेप्रमाणे आता विधीमंडळाचं कामकाजही लाईव्ह दाखवलं जाणार आहे.

भाजप सरकारने विधीमंडळाचं कामकाज लाईव्ह दाखवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर प्रश्नोत्तराच्या तासाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं आहे. याशिवाय विधिमंडळाची स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पदेखील मार्गी लावण्यात येणार आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीपासून सर्व खासगी वाहिन्यांसाठी हे प्रक्षेपण उपलब्ध केलं जाईल. त्यामुळे विधीमंडळात नेते काय काय प्रश्न विचारतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.