प्रसाद रेशमे महावितरणचे मुख्य अभियंता

0
15

नागपूर- प्रसाद रेशमे यांनी आज महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून विद्यमान मुख्य अभियंता सतीश बापट यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन वीजचोरी व वीज बिलाच्या थकबाकीबाबत कडक पावले उचलून महावितरणचा महसूल वाढविण्यावर भर देणार असल्याचा मनोदय श्री.रेशमे यांनी यावेळी व्यक्त केला.
विदयमान मुख्य अभियंता सतीश बापट यांचे मुंबई येथील महावितरणच्या मुख्यालयात स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागेवर प्रसाद रेशमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री रेशमे हे यापूर्वी जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. साकोली विभागात कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, भंडारा येथे कार्यकारी अभियंता व नागपूर शहर परिमंडळात अधीक्षक अभियंता अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. नागपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या पाच जिल्हयांचे नियंत्रण प्रसाद रेशमे यांच्याकडे असणार आहे.