पक्ष्यांच्या अन्न, पाणी व निवार्‍याची सोय

0
12

गोंदिया : गोंदिया पब्लिक स्कूल येथे सामजिक वनिकरण विभाग व गोंदिया पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात चिमुकल्या विद्यार्थ्यानी पक्ष्यांसाठी अन्न, पाणी व निवार्‍याची सोय केली. उन्हाच्या दाहकतेने अंग भाजून निघत आहे. मनुष्याला जश्ी निवार्‍याची गरज असते तसेच पक्ष्यांना निवार्‍याची सोय व्हावी म्हणून गोंदिया पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात सुंदर घरटी तयार करून शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांवर टांगले. पष्यांचे भोजन म्हणून तांदूळ ठेवण्यात आले. पाण्यासाठी भांडी ठेवण्यात आली. यावेळी सामाजिक वनिकरणाचे वनसंरक्षक ठवरे, कातोरे, युवराज कुंभलकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्याना सामाजिक दायीत्वावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर उपक्रम विद्यार्थ्यानी आपल्या घराच्या परिसरातही राबविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी डीबीएम एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. इंदिरा सपाटे म्हणाल्या, पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी आम्ही, आमची शाळा व आमचे विद्यार्थी सदैव तत्पर राहतील. यावेळी प्राचार्या रिता अग्रवाल, प्रफुल्ल वस्तानी, प्राथमिक विभाग तसेच ब्लुमिंग बर्डस्च्या कार्यवाह लुसी नायर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.संचालन शिक्षिका येडे यांनी केले. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय हरित सेनेच्या प्रभारी वर्षा भांडारकर व इतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.