दररोज १२०० मुले मलेरियाचे शिकार !

0
11

युनिसेफचा धक्कादायक अहवाल

वृत्तसंस्था
वाशिंग्टन : संयुक्त राष्ट्र बाल कोष (यूनीसेफ) या संघटनेने जगभरातील मलेरियाबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आणली आहे. जगभरात दररोज १ हजार २०० चिमुरड्यांचा मृत्यू होतो, अशी माहिती यूनीसेफने दिली. संयुक्त राष्ट्र एजेंसीने जागतिक मलेरिया दिनाच्या आधी फॅक्ट्स अबाऊट मलेरिया अँड चिल्डड्ढन नावाचा अहवाल जारी केला.
जगभरात मलेरियामुळे होणा-या मृत्यूबाबतची आकडेवारी यूनिसेफने प्रसारीत केली आहे. या आकडेवारीनुसार जगभरात रोज १२०० मुले मलेरियामुळे मृत्युमुखी पडत आहेत. मात्र या आकडेवारीत २००० सालाच्या तुलनेत ४० टक्के घट झाली आहे.
संयुक्त राष्ट्राने जागतिक मलेरिया दिवसाच्या आधी ‘फॅक्ट अबाऊट मलेरिया अ‍ँन्ड चिल्डड्ढनमध्ये ही आकडेवारी दिली आहे. जगभरात लहान मुले आणि गर्भवती महिलांवर मलेरियाचा होणार प्रार्दुभाव दाखवणे, हा यामागील उद्देश आहे.
डब्ल्यूएचओच्या रिपोर्टनुसार मलेरियामुळे होणा-या मृत्यूत जगभरात ४७ टक्कयांपर्यंत घट झाली आहे. मलेरियामुळे मृत्यू होणा-यांमध्ये ७८ टक्के पाच वर्षाखालील मुलांचा समावेश आहे. २०१३ मध्ये ५,८४,००० लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला होता, ज्यात ९० टक्के लोक आफ्रिकी देशातील होते. तसेत दररोज १२०० पेक्षा जास्त मुले या रोगाचा शिकार होतात.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मलेरियामुळे पाच लाख चिमुरड्यांचा मृत्यू होणे ही अतिशय दु:खद आहे. शिवाय दिवसेंदिवस मलेरिया आपल्यासमोर आव्हान उभे करते आहे, अशी यूनीसेफचे सहाय्यक निर्देशक मिकी चोपडा यांनी चिंता व्यक्त केली आहे.
९० टक्के अफ्रिकन देशातील संख्या
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मलेरियामुळे २०१३ मध्ये जगात ५ लाख ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ९० टक्के मृत्यू हे अफ्रिकन देशांमध्ये झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मलेरियाबाबत जागतिक स्तरावर प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.