नांदेड शहरातील चार शिकवणी वर्गांवर आयकर विभागाचा छापा

0
11

नरेश तुप्तेवार

नांदेड,दि.26 : नांदेड शहरात चालणाऱ्या खाजगी शिकवणी संस्थांवर आज आयकर विभागाने छापे टाकले असून चार शिकवणी संस्थांची सविस्तर तपासणी सुरू आहे. 25 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 2 वाजेच्या आसपास नांदेड शहरातीलबाबनगर, शामनगर भागात चालणाऱ्या शिकवणी चालक आर.बी. जाधव, सुर्यवंशी, वाकडे, नानवटे या चार जणांच्या शिकवणी वर्गांवर, कार्यालयांवर आणि त्यांच्या घरावर एक वेळेसच आयकर अधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. सध्या त्यांच्या घरात, शिकवणी वर्गात, कार्यालयात तपासणी सुरू आहे. धाडी नंतर शिकवणी वर्गाला सुट्या देण्यात आल्या त्यानंतर शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भरमसाठ फिस वसूल केल्याने विद्यार्थ्यांमध्ये “खुशी “”तर कोचिंग कलासेस च्या संचालक मध्य”गम “होता.या त्याठिकाणी आयकर अधिकाऱ्यांना काय सापडले हे सांगण्या इतपत माहिती प्राप्त झाली नाही. चार शिकवणी वर्गांवर झालेल्या या आयकर विभागाच्या तपासणी अनेक वर्षांपासून शिकवणी चालक मनमानी फिस जमा करत होते यावर प्रसार माध्यमांनी अनेकदा लिखाण केले होते.
या अचानक झालेल्या कार्यवाई ने विद्यार्थ्यांमध्ये आपली फिस वसूल झाल्याची हळूवर चर्चा होती.पण आता नवीन आलेल्या कायद्यानुसार त्यांनी सादर केलेल्या आयकर नोंद पत्रामधून प्राप्त माहितीनुसार आयकर विभागाने चार शिकवणी वर्ग चालकावर आजचे धाडसत्र नियोजीत केले आहे, अशी खात्रीलायक माहिती आहे.

आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गांमध्ये सर्व व्यक्ती नांदेड जिल्ह्याच्या बाहेरचे असल्यामुळे कोणता आयकर अधिकारी या धाडसत्राचा प्रमुख आहे याची माहिती प्राप्त होऊ शकले नाही. नांदेडच्या एका आयकर सल्लागाराने सांगितले की, अशी धाड आल्यानंतर त्याठिकाणी सर्वसामान्य खिळ्यापासून ते मौल्यवान वस्तुंची तपासणी होत असते. त्या सर्वांच्या एकत्रीत किंमतीनुसार त्या व्यक्तीचे उत्पन्न तपासले झाले आणि त्यानुसार त्याने भरलेला आयकर आणि उत्पन्नातील तफावत काढली जाते आणि त्याचे डिक्लरेशन होते. या चार लोकांकडून किती डिक्लरेशन होईल ही सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतरच कळेल.