तंटामुक्त समिति एकोडीने लावले प्रेमी युगुलाचे शुभमंगल

0
7

गोंदिया,दि.२६: तालुक्यांतर्गत येत असलेल्या एकोडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समीतीने दोन प्रेमी युगुल कमल कुमानसिंग आमगोट(२१) रा.एकोडी व अपेक्षा जितेंद्र करवड (२०) रा.तिरोडा यांचे विवाह एकनाथ महाराज मंदिर येथे हिंदू रितीरिवाजा नुसार विवाह लावण्यात आले. दोन्ही अलग-अलग जातीचे असल्याने कागदोपत्री कार्यवाही पुर्ण करुन विवाह सोहळा तंमुस अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, सरपंच रविकुमार (बंटी) पटले, डॉ.भरत रिणायत,चुन्नीलाल बिसेन ,सुरेश भगत,सेवक चौधरी,जगत पटले,भाऊलाल पटले, विष्णुदयाल बिसेन,खुमानप्रसाद मिश्रा,शामलाल पिछोडे,प्रेमलाल बरियेकर,मोरेंद्र बोरकर, राजेश हरिणखेंडे,पंकज मेश्राम, विनोद बरियेकर,काल्लु चौधरी,पटले काकु व गावकरी नागरिक उपस्थित पार पडला.