अदानी पॉवरच्या उत्पन्नात २४ टक्क्यांनी वाढ

0
14

वृत्तसंस्था
अहमदाबाद दि. १८-: अदानी पॉवर लि. या अदानी एंटरप्रायझेस लि.ची उपकंपनी आणि अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीने ३१ मार्च २0१५पर्यंतच्या आर्थिक वर्षातील व चौथ्या तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर केले. संपूर्ण वर्षात एकत्रित एकूण उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढून १९५४५ कोटी रुपये झाले. या तुलनेत गेल्या वर्षी याच काळात ते १५७६८ कोटी रुपये होते. गेल्या वर्षातील ७१८२ मेगावॅटच्या तुलनेत यंदा ८८९१ मेगावॅट इतक्या इफेक्टिव्ह ऑपरेशन्स क्षमतेमुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली. एकत्रित एबिटामध्ये १७ टक्के म्हणजे ६0८३ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षी हे प्रमाण ५२११ कोटी रुपये होते. तिमाहीत एकत्रित एकूण उत्पन्न ४६६८ कोटी रुपये होते. तिमाहीत एकत्रित एबिटाचे प्रमाण १३६0 कोटी रुपये होते. ट्रान्समिशन व्यवसायाचे डीर्मजर आणि त्यानंतर अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला ट्रान्समिशन व्यवसायाचा हिस्सा विकल्यामुळे तिमाहीमध्ये आणि वर्षात उत्तम कामगिरी करण्यात आली. तिमाही आणि वर्षादरम्यान, कंपनीने कंपनी कायदा, २0१३मधील शेड्युल-२मध्ये नमूद केल्याप्रमाणे स्थिर मालमत्तांच्या उपयोगितेच्या जीवनमानाविषयी नव्याने अंदाज व्यक्त केला आहे आणि त्यानुसार तिमाही व वर्षासाठी घसारा ७२0 कोटी रुपयांनी कमी केला आहे.