अर्जुनी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता

0
14

बोंडगावदेवी ,दि.१९: तालुक्यातील सहकार विभागाला ढवळून काढणार्‍या अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न समिती बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. सत्ताधारी भाजपासर्मथित किसान विकास आघाडीने एकहाती विजयी संपादन करून आपले वर्चस्व दुसर्‍यांदा कायम ठेवले. मात्र जिल्हा दुध संघाचे संचालक माजी आ.दयाराम कापगते यांच्या पुत्राचा पराभव टाळण्याची किमया भाजपा करू शकली नाही. ‘गड आला, पण सिंह गेला’ असे म्हणण्याची पाळी भाजपावर आली आहे.
बाजार समितीच्या १९ संचालकासाठी ही निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपासर्मथित किसान विकास आघाडी व काँग्रेस-राष्ट्रवादी सर्मथित परिवर्तन पॅनल या दोन गटामध्ये चुरस होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोन्ही पॅनलने सर्व आयुधांचा वापर करून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी गटाची सत्ता पालटण्यासाठी विरोधकांकडून शर्तीचे प्रयत्न केल्या गेले. परंतु मतदारांनी सत्ताधारी किसान विकास आघाडीला कौल देऊन बाजार समिती पुन्हा भाजपच्या ताब्यात देण्यात कसर सोडली नाही.
विजयी उमेदवारांमध्ये किसान विकास आघाडीचे सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) गटामधून लायकराम भेंडारकर (२८९ मते), प्रमोद लांजेवार (२७६), प्रदीप मस्के (२६४), यशवंत कापगते (२५६), कुरैशी काशिफ जमा (२४६), छगन पातोडे (२३६), बिसराम फुलबांधे (२११), सहकारी संस्था महिला राखीव गटातून कुंदाबाई डोंगरवार (२७१), कमलाबाई कठाणे (२२९), इतर मागासवर्ग राखीव गटातून नूतनलाल सोनवाने (२५0), आर्थिक दुर्बल घटकामधून विलास फुंडे (२७६), ग्रामपंचायत अनु.जाती/जमाती गटातून व्यंकट खोब्रागडे (३१३), विपणन व प्रक्रिया गटातून केवलराम पुस्तोडे (१९), हमाल/तोलारी गटामधून चंद्रशेखर मेश्राम (३२) यांचा समावेश आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सर्मथित परिवर्तन पॅनलचे ग्रामपंचायत मतदार संघातून विलास गायकवाड (२६२), व्यापारी व अडत्या गटातून सोमेश्‍वर सौंदरकर (१५), ईश्‍वरी चिठ्ठीने सर्वेश वल्लभदास भुतडा (१४) हे उमेदवार विजयी झाले.