एकत्र चाललो तरच देश प्रगती करेल- नरेंद्र मोदी

0
11

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-  तू-तू, मी-मी करून देश चालत नाही तर एकत्र चालण्याने देश प्रगती करतो. समता, ममता असेल तर देशाची प्रगती होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) राज्यसभेत बोलताना म्हटले आहे. 

मोदी म्हणाले, ‘राज्यघटना आपली मार्गदर्शक असून राज्यघटनेवर चर्चा हा राज्यघटनेचा सन्मान आहे. राज्यघटना सामाजिक दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशातील सर्वच महापुरूषाला अभिवादन करतो. औद्योगिकरणाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी बोलायचे. औद्योगिक विकासाचे महत्व त्यांनी जाणले होते. औद्योगीकरण हाच भारताच्या कृषी समस्येवरील उपाय आहे. औद्योगिक विकासाने देशात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.‘ 

‘श्रेष्ठ व्यक्तींच्या कार्याचे नागरिक अनुसरण करतात. येथे झालेला संवाद तळागाळातील लोकांपर्यंत पोचतो. शाळेत संविधानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यायला हवी. भेदभाव हा समाजाला लागलेला कलंक आहे,‘ असेही मोदी म्हणाले.