निलेश राणे अडीच तासांपासून पोलीस स्टेशनमध्ये

0
6

रत्नागिरी : काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी, काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी आज चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. जवळपास अडीच तासांपासून ते पोलीस स्टेशनमध्येच आहेत.

मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीमध्ये गेल्या रविवारी निलेश राणे यांची सभा होती. परंतु या सभेला संदीप सावंत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले नाहीत. याच रागातून संदीप सावंत यांना चिपळूणजवळच्या घरातून मुंबईला नेण्यात आलं, तसंच प्रवासादरम्यान गाडीत मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

स्वत: निलेश राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.