तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भूमिपूजना दरम्यान दाखवले काळे झेंडे

0
27

गडचिरोली –तेलंगणा सरकारद्वारे प्रस्तावित मेडिगट्टा-कालेश्वर धरणाचे भूमिपूजन आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते पार पडले. याविरोधात ब्रम्हपुरीचे आमदार व प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांसह मेडिगट्टा येथे भूमिपूजनस्थळी पोहोचून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना के. चंद्रशेखर राव यांना  काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार नारेबाजीही करण्यात आली.
तेलंगणा सरकारद्वारे पोचमपल्ली येथे मेडिगट्टा-कालेश्वर धरण बांधण्यात येणार आहे. या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील २२ गावांमधील सुपिक शेतजमीन पाण्याखाली बुडणार असल्याने सुमारे १८ हजार शेतकऱ्यांच्या हातातील उत्पन्न जाईल, अशी स्थिती असून, बाजारपेठही थंडावणार आहे. medigattaशिवाय या धरणामुळे केवळ तेलंगणा राज्यालाच पूर्णपणे फायदा होणार आहे. त्यामुळे धरणाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी १ व २ फेब्रुवारीला पोचमपल्ली ते सिरोंचा अशी शांतीपदयात्रा काढली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधाला न जुमानता ८ मार्च रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एका करारावर स्वाक्षरी केली.
आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते कालेश्वर-मेडिगट्टा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून, चंद्रशेखर राव हे चार मंत्र्यांसह आज सकाळी १० वाजता हेलिकॉप्टरने कन्नेपल्ली येथे पोहोचले.