उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीत काँग्रेसचा विजयाचा दावा

0
7

डेहराडून, दि. १० – उत्तराखंड विधानसभेतील बहुमत चाचणी मंगळवारी सकाळी पार पडली हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चिन्हे आहेत. या बहुमत चाचणीवेळी हरीश रावत यांना ३४ तर भारतीय जनता पक्षाला २८ मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून काँग्रेसने विजयाचा दावा केला आहे. मात्र खरा विजय कोणाचा झाला हे उद्याच स्पष्ट होणार असून सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल जाहीर करणार आहे.
मंगळवारी सकाळी पार पडलेल्या या बहुमत चाचणीत काँग्रेसच्या बंडखोर आमदारांशिवाय इतर सर्वांनी आपले मत नोंदवले. दुपारी १२ च्या सुमारास ही चाचणी संपली आणि सर्व आमदार सभागृहातून बाहेर पडले.