गोंदिया-तिरोडा पालिकेत नगराध्यक्ष जनता निवडणार

0
9

मुंबई-महाराष्ट्र सरकारने आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये एका प्रभागतून दोन नगरसेवक निवडून देण्याचा निर्णय घेत नगराध्यक्ष मात्र थेट जनतेतूनच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यापुर्वी काँग्रेससरकाने सुध्दा एकदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेतला होता.त्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेत नगराध्यक्ष एैकत नसल्याचे कारण पुढे केल्याने नंतरच्या निवडणुकीत नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडण्याचे अधिकार देण्यात आले होते.आता भाजपयुती सरकारने डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष हे थेट जनतेतूनच निवडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे जनतेला योग्य आणि सक्षम नगराध्यक्ष निवडण्याची संधी मिळणार आहे.तर एका प्रभागत दोन वार्डा राहणार आहेत.गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा पालिकेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ घातल्या असून नगराध्यक्ष पद थेट जनतेला निवडून द्यायचे आहे.