स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा- उद्धव ठाकरें

0
9

मुंबई, दि. 19 – स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. युती तोडण्याची आमची इच्छा नाही. लाट निघून गेल्यानंतर गोटेही उघडे पडतात आणि लाटेत ओंडकेही तरंगत असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मित्र पक्ष भाजपवर केली आहे. शिवसेनेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत असल्यानं गोरेगाव येथील एनएससी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेनं आतापर्यंत लाखो शिवसैनिक जोडले आहेत. सेना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत, अस म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. एनएसईच्या प्रांगणात लोकनृत्‍यांनी सुरू झालेल्‍या वर्धापन दिनाच्‍या कार्यक्रमात हजारो शिवसैनिक मोठ्या उत्‍साहाने सहभागी झाले होते. शिवसेना नेते, उपनेते, शिवसेनेचे खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, नगरसेवक, महापालिकांचे लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.
काय म्‍हणाले उद्धव ठाकरे..
– वाघ कधीच मागे वळून बघत नाही, तो पुढेच जातो.
– पवारसाहेब, आमचं आणि भाजपचं आम्ही बघून घेऊ.
– महागाई नियंत्रणात आणा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन.
– ‘देश बदल रहा है’, पण परिस्थिती बदलली नाही, भाजपला टोला.
– युती केल्यास स्वाभिमानाने करु, लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही
– संकटाच्या काळात धावून शिवसेनेचा वाघच येतो.
– लाट निघून गेल्यानंतर गोटेही उघडे पडतात, उद्धव यांचा अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा
– आम्ही सत्तेसाठी कधी लाचार झालो नाही, सत्तेसाठी वेडीवाकडी तडजोड केली नाही.
– लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा.
– आम्ही सत्तेमागे कधीच धावलो नाही.
– शिवसेनेवर बंदी आणण्‍याचे उद्योग अनेकवेळा झाले आहेत.
– शिवसेनेने अनेक लाटा पाहिल्‍या आहेत. आणीबाणीच्‍या लाटीचा उल्‍लेख.
– ज्या मातीत शिवराय, बाळासाहेब जन्मले, तिथे जन्मलो, हे भाग्य आहे.