भाजपप्रदेशाध्यक्षांनी दिले वेगळ्या विदर्भाचे संकेत

0
10

विशेष प्रतिनिधी
शिर्डी,(बेरार टाईम्स)दि..30 – वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी आधीपासूनच आपल्या विचारावर ठाम आहे आणि वेगळ्या विदर्भाला पाठिंबा सुद्दा आहे. छोटे राज्य झाल्यास प्रशासनाच्या दृष्टीने योग्य आहे असल्याची भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दाणवे यांनी जाहिर केली आहे.मात्र राजकारण डोळ्यासमोर ठेवून विभाजन करण्याला भाजपाचा विरोध आहे. आम्ही योग्यवेळी वेगळ्या विदर्भाचा निर्णय घेऊ.शिवसेनेचा विरोध असला तरी योग्य वेळी महाराष्ट्राचे विभाजन करणार, आमच्या युतीचा या विषयाशी काहीही संबध नाही असेही ते म्हणाले.दाणवे यांच्या या भूमिकेने विदर्भाच्या निर्मितीचे संकेत स्पष्ट झाले असून विधानसभेतील गोंधळाला एकप्रकारे समंती मिळाली आहे.